ताटात भाकरीचा समावेश आवश्यक कृषि अधिकारी यांचे आवाहन

उमरगा तालुक्यातील मौजा कोराळ येथे मंडळ कृषी अधिकारी उमरगा यांचे मार्फत पौष्टिक तृणधान्य बाबत जनजागृतीप्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री.ए. बी. पटवारी उपस्थित होते. यावेळी गावातील उपस्थित ग्रामस्थांना शिवार फेरीच्या माध्यमातून ज्वारी पिक प्रक्षेत्र व त्याबद्दल च्या समस्या याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. श्री. पटवारी यांनी सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी श्री. सागर बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →