आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून पौष्टीक तृणधान्यचे आहारीतील महत्त्व , प्रभात फेरी व जनजागृती कार्यक्रमाचे भोळी ता खंडाळा जि सातारा येथे आयोजन

महाराष्ट्र शासन कृषी विभागा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय खंडाळा मार्फत आज मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी मौजे भोळी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 कार्यक्रम आयोजित केला.सदर कार्यक्रमास न्यु.इंग्लिश मिडीयम स्कुल भोळी यांचा सहभाग घेऊन घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 ह्या भोळी येथे आयोजित कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य श्री. उपार एल.डी सर यांनी पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व व आपल्या दैनंदिन जिवनात रोजचा आहार कसा आसावा हे सांगितले. श्री. संतोष क्षीरसागर कृषी सहायक भोळी यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 या विषयी सखोल माहिती दिली.मिलेट्स ऑफ मंथ म्हणून बाजरीचे आहारातील महत्व व बाजरीचे विविध पदार्थ तसेच बाजरी प्रक्रिया उद्योग या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी यांची शिक्षकांच्या मार्गदर्शना नुसार प्रभात फेरी काढण्यात आला. या प्रभात फेरीत गावातील नागरीकांच्यात जागृती करण्यासाठी पौष्टिक तृणधान्य विषयावर घोषणा देण्यात आल्या.कार्यक्रमाच्या शेवटी शाळा कमिटीचे श्री. देवानंद चव्हाण यांनी आभार मानले. य कार्यक्रमात श्री. उपर एल.डी. प्राचार्य ,श्री. कुंभार एन.एम.सर,श्री. शिंदे एम.एच.सर,सौ.खांडके एस.एस.मँडम, सौ.शिंदे यु.ए.मँडम,श्री. संतोष क्षीरसागर कृषी सहायक भोळी,श्री. हरिश्चंद्र लिमण मा. सरपंच भोळी,श्री. देवानंद चव्हाण,श्री. भरत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →