आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निम्मित पौष्टीक तृणधान्य चे आपल्या आहारात असणारे महत्त्व याविषयी मरिआईचीवाडी ता खंडाळा जि सातारा येथे कार्यक्रमाचे आयोजन

आज मरिआईचीवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला. मा. कुलकर्णी साहेब मंडळ कृषी अधिकारी लोणंद यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली.तृणधान्य चे आपल्या आहारात असणारे महत्त्व याविषयी विवेचन केले. सद्या बाजरी ,नाचणी सारख्या पिकाचे क्षेत्र कमी होत चालले आहे.त्यामुळे आपल्या आहारात प्रमाण कमी आहे.ते वाडविने गरजेचे आहे.पूर्वी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर असल्याने आजार कमी होते.बाजरी,नाचणी,रागी,वराई ,राजगिरा यांचे सेवनाने शरीराला होणारे फायदे नमूद केले. बाजरीच्या भाकरी निर्यात होतात.याकडे आपण लक्ष देऊन महिलांनी प्रक्रिया उद्योगात उतरले पाहिजे. गटाच्या माध्यमातून बाजरी सारख्या पिकावर मूल्य वर्धन करून पदार्थ बनविले तर त्याचे ब्रॅण्डिंग केल्यास निश्चित आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.तरी सर्वांनी मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.मा.शेंडगे साहेब कृषी पर्यवेक्षक लोणंद यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग बद्दल माहिती दिली.या कार्य क्रमास मरी आईची वाडी च्या सरपंच अश्विनी चोरमले मॅडम , उपसरपंच जलिंधर रासकर,संतोष खताळ,लक्ष्मण कुंडलकर ग्रामपंचायत सदस्य,

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →