आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तालुका कृषी अधिकारी लातूर कार्यालयात आज बाजरी पिकाची पाककला स्पर्धा

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तालुका कृषी अधिकारी लातूर कार्यालयात दि. 23.01.2023 रोजी बाजरी पिकाची पाककला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये बाजरी पासून विविध उपपदार्थ बनवून स्पर्धेमध्ये सहभागी घेतले होते. यात बाजरीचे वडे, बाजरी इडली, बाजरीच्या भाकरी, बाजरीच्या धपाटे, बाजरीचे धिरडे, बाजरीचे आप्पे, पेढे यासारख्या विविध पदार्थांच्या बाबतीत या ठिकाणी स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अठरा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धकाचे परीक्षका मार्फत पाहणी करून अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक चे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक श्वेता गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी महेश क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, तंत्र अधिकारी माधुरी सुरवसे, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, कृषी अधिकारी योगीता आरदवाड, मंडळ कृषी अधिकारी आर. आर. गायकवाड, सचिन बावगे, व्यंकट चौधरी, तालुका तंत्र व्यवस्थापक सचिन हिंदोळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे यांनी केले सर्व पाककृती यांचे परीक्षण civil हॉस्पिटल लातूर येथील आहार तज्ञ श्रीमती डख यांनी केले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. याप्रसंगी साहेबराव दिवेकर यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्षानिमित्त विविध उपक्रमाची माहिती दिली आणि आरोग्यासाठी बाजरी महत्त्वाची आहे याबाबतीत मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →