महाराष्ट्र शासन कृषि विभाग, तालुका कृषि अधिकारी खंडाळा यांच्या वतीने जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने राजेंद्र महाविद्यालय खंडाळा यांच्या सहकार्याने खंडाळा शहरात जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे प्रचार, प्रसिद्धी बाबत प्रभातफेरी काढण्यात आली. सदरील प्रभातफेरी ही श्री. गजानन ननावरे, तालुका कृषि अधिकारी खंडाळा यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. या वेळेस श्री. विलास धायगुडे, कृषि अधिकारी खंडाळा- यांनी या वेळेस जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष कश्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे त्या बद्दल सविस्तर माहिती दिली. या वेळेस श्री. फरांदे, प्राचार्य- राजेंद्र महाविद्यालय खंडाळा, श्री. वैभव क्षीरसागर- मंडळ कृषि अधिकारी खंडाळा, श्री. राजेश कुलकर्णी- मंडळ कृषि अधिकारी लोणंद, खंडाळा तालुक्यातील सर्व कृषि पर्यवेक्षक, सर्व कृषि सहाय्यक उपस्थित होते. श्री. समीर चव्हाण, आत्मा. BTM, यांनी आभार मानले