जळगाव – भरडधान्य कार्यक्रमाचं आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं संयुक्त राष्ट्रांनी विद्यमान वर्ष हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं आहे. आपल्या आहारात भरडधान्यांचं महत्त्व किती आहे, हे लोकांना समजावून सांगण्यासाठी राज्य सरकारतर्फेही विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत, असं कृषीसंचालक विकास पाटील यांनी म्हटलं आहे. यापैकीच एका कार्यक्रमाचं आयोजन जळगावातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं होतं. यानिमित्तानं मिलेट मॅरेथॉन, भरडधान्य पदार्थांच्या पाककृती स्पर्धा, प्रदर्शन, या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची व्याख्यानं आणि कार्यशाळा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. फास्ट फूडमुळे विविध आजार लोकांना होत आहेत. म्हणून भरडधान्यांचा समावेश आहारात आपण केला पाहिजे, असं पाटील यावेळी म्हणाले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →