Run For Shahada च्या निमित्ताने…आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून शहादा फर्स्ट व गंगोत्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजता तालुका कृषी अधिकारी शहादा जिल्हा नंदुरबार यांचेकडून मिलेट रॅली चे आयोजन करण्यात आले होते… सदर रॅली शहादा शहरातील जनता चौक ते शिवस्मारक इथपर्यंत काढण्यात आली होती सदर रॅलीमध्ये शहादा तालुक्याचे सर्व सन्माननीय अधिकारी व लोकप्रतिनिधी, शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यानिमित्ताने सर्वांना पौष्टिक तृणधान्याबाबत जागरूकता करण्यात आली आहे व सर्वांनी आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्य चा वापर करावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे…. सदर मिलेट रॅलीस सन्माननीय श्री अभिजीत दादा पाटील माजी कृषी सभापती जि प नंदुरबार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे……