आज दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी मौजे भानसोली तालुका कर्जत येथे आत्मा अंतर्गत प्रक्रिया उद्योग शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले सदर शेतीशाळेत कृषी पर्यवेक्षक श्री गलांडे सर यांनी पीएमएफएमई योजनेविषयी माहिती दिली. तसेच BTM श्रीम. रेश्मा मते यांनी नाचणी पिकाचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले तसेच कृषी सहाय्यक अनुराधा अंधारे, रेश्मा मते, मिनल देशमुख यांनी नाचणी लाडू व नाचणी बर्फी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त शपथ घेण्यात आली. तसेच त्याचे महत्व पटवून देण्यात आले.