तालुका कृषी अधिकाऱ्यांनी निर्माण केली शालेय विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्यांबाबत जागरूकता

जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सडक अर्जुनी, जि. गोंदिया येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 निमित्त प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्वारी, बाजरी, नाचणी, नागली, राजगिरा व इतर पौष्टिक तृणधान्यांचे दैनंदिन आहारातील महत्त्व कु. प्रतिक्षा मेंढे, मंडळ कृषी अधिकारी तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी, सडक अर्जुनी यांनी विद्यार्थ्यांस पटवून दिले. सदर कार्यक्रमाच्या वेळी प्राचार्य श्री अनिल मेश्राम, इतर शिक्षकवृंद, शालेय स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →