कोपरगाव तालुक्यात आज महीला बचतगटाच्या महीलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कृषी विभागाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने भाग घेतला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी देखील सहभाग घेतला. त्यात कृषी विभागाच्या निर्मला सोनवणे कृषि सहायक यांना बाजरीच्या कापण्या या पदार्थासाठी द्वितीय पारितोषिक मिळाले.