आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त मौजे भिवडी कुडाळ मंडळ ता.जावली येथे महिला मेळाव्याचे आयोजन

मौजे भिवडी कुडाळ मंडळ ता.जावली येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त तालुका कृषी अधिकारी जावळी श्री रमेश देशमुख व मंडळ कृषी अधिकारी कुडाळ श्री ज्ञानदेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मेळावा घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक वक्ते श्री. भानुदास चोरगे कृषी सहाय्यक, धनंजय सापते कृषी सहाय्यक व महिलां शेतकरी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महिला शेतकरी यांना श्री. भानुदास चोरगे यांनी नाचणी,वरई,राजगिरा, ज्वारी व बाजरी इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकांसंदर्भात सदर पिकांचे आहारातील असलेले महत्त्व व फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.महिला मेळावा घेण्यात आला. सदर कार्यक्रमास गावातील महिला बचत गट अध्यक्ष व सदस्य तसेच महिला ग्रामपंचायत सदस्य व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित महिलांना बाजरीचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यात आले. कृषी सहाय्यक श्री धनंजय सापते यांनी उपस्थित सर्व महिला चे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे घोषित केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →