आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष सन 2023 अंतर्गत मोरघर ता जावली जि सातारा येथे महिला मेळाव्याचे आयोजन

मौजे मोरघर मंडल कुडाळ ता जावली जि सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष सन 2023 अंतर्गत तालुका कृषी अधिकारी श्री रमेश देशमुख व मंडळ कृषी अधिकारी कुडाळ श्री ज्ञानदेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मेळावा घेणात आला सदर कार्यक्रमासाठी गावचे सरपंच सदस्य पुरष महिला तसेच कृषी विभागाचे अधिकारी व्ही टी मोहिते, एस एस कदम व डी बी जाधव यांनी या पौष्टिक तृणधान्याच्या आहारातील महत्त्व विशद केले त्यामध्ये प्रामुख्याने बाजरी पिकाचे आहारातील महत्त्व यावरती सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच महिला शेतकरी बचत गटामार्फत पौष्टिक तृण धान्यावरती आधारित विविध प्रक्रियायुक्त प्रकल्पांची उभारणी करून गटाच्या माध्यमातून उत्पादन व विक्री केल्यास महिला बचत तयार आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. त्याकरता कृषी विभागामार्फत त्याकरिता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून सहकार्य घेण्याचे आवाहन केले. उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे घोषित केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →