संक्रातीचे वाण म्हणून बाजरीच्या पिठाचे वाटप

सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक धान्य वर्ष म्हणून जाहीर झाले आहे यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाने या भरड धान्याची लागवड व त्याचा वापर दोन्ही वाढावे या दृष्टीकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तिफन फाउंडेशन शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कृषी विभागाला वेगवेगळ्या प्रकारे मदतच करत असते . 15 जानेवारी 2023 रोजी तिफन फाउंडेशन ने डॉक्टर प्रशांत भोसले यांचे मानवी आहारातील पौष्टिक दृणधान्याचे महत्त्व या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली होती. तसेच यावेळी मकर संक्रांतीचे निमित्ताने महिला जे वाण हळदी कुंकवाचे निमित्ताने लुटतात ते वाण तिफन फाउंडेशन सदस्य राजेंद्र कदम यांच्या पत्नी सौ विद्या राजेंद्र कदम यांनी पौष्टिक तृणधान्य बाजरीचे पीठ अर्धा किलोचे पॅकिंग मध्ये करून अमृत गंगा सोसायटी माणिक बाग सिंहगड रोड पुणे येथील महिलांना तिफन फाउंडेशनचे वतीने देण्यात आले . त्या भेटवस्तूवर तिफन फाउंडेशन व मिलेट्स सिम्बॉल आहेत. व एक पौष्टिक धान्य संबंधी संदेश आहे .उपस्थित महिलांना भरड धान्याचे महत्त्व समजावून सांगितले. उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले छायाचित्रांमध्ये कार्यक्रमांमध्ये सहभागी महिला दिसत आहेत

शेअर करा...