धरणगाव तालुक्यात बाबुळगाव येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 कार्यक्रम

धरणगाव तालुक्यात बाबुळगाव येथे आज दिनांक 12 जानेवारी रोजी कृषी विभागा व आत्मा विभाग अंतर्गत पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 कार्यक्रम व किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी टी एम आत्म दीपक नागपुरे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी उपप्रकल्प संचालक आत्मा जळगाव श्री तडवी साहेब, तालुका कृषी अधिकारी धरणगाव श्री चव्हाण साहेब,आत्म समिती अध्यक्ष सुधाकर पाटील,डॉक्टर महाजन साहेब,समाधान पाटील, लोटन पाटील,संजय गांधी समिती अध्यक्ष गजानन पाटील,शेतकी संघ अध्यक्ष नवल पाटील,सरपंच सुरेश भालेराव,कृषी सहायक किरण वायसे, कृषी सेवक चंद्रकांत जाधव,गजानन मोरे,विमल सुरावर, दिनेश न्याहळद,कृषी सखी चंद्रकला पाटील,सीआरपी मनीषा कोळी इत्यादी उपस्थित होते. डॉक्टर पुष्कर महाजन यांनी तृणधान्य व त्याचे महत्त्व याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.लोटन पाटील यांनी फवारणी करता घ्यायची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.समाधान पाटील यांनी लघुउद्योग सुरू करण्यासाठी सुरू असलेली pmfme योजनेविषयी उपस्थित महिलांना सविस्तर माहिती दिली,दीपक नागपुरे यांनी गट तयार करून त्या मार्फत विविध उद्योग सुरू करणे याविषयी महिलांना मार्गदर्शन केले,

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →