महिला शेतकरी गटांनी पौष्टिक तृणधान्यावर लक्ष केंद्रित करावे.

पंचायत समिती सभागृह,ता.भूम जि. उस्मानाबाद येथे स्वयं शिक्षण प्रयोग(SSP) द्वारे आयोजित भूम तालुक्यातील 50 गावातील प्रतिनिधी(सरपंच, ग्रामरोजगार सेवक,महिला सखी) यांची संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यशाळेत निखिल रायकर,मंडळ कृषी अधिकारी,ईट यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करताना विविध उपक्रम राबविण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पौष्टिक तृणधान्य ची ओळख,त्याचे आरोग्यासाठीचे महत्व व प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी असलेली संधी इ. बाबत सविस्तर माहिती सांगितली. वैयक्तिक शेतकरी यांनी पौष्टिक तृणधान्य बाबत काम करण्यास सध्या या वर्षात बाजारात मागणी असून त्याची लागवड करण्यास प्रोत्साहित केले. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांनीसुद्धा पौष्टिक तृणधान्य पिकांवर त्या पासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थावर काम करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उदेशाने PMFME योजने बाबत माहिती दिली.तसेच पौष्टिक तृणधान्य पदार्थांची पाककला स्पर्धा,पौष्टिक तृणधान्य थाळी इ चे नियोजन करण्याबाबत महिला बचत गट व स्वयं शिक्षण प्रयोग चे अधिकारी यांना आवाहन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →