पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम

वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट आयोजित जयवंतनगर,बेदरवाडी, अंतरवली, जेजला, तींत्रज, सावरगाव,आनंदवाडी या मंडळ कृषी अधिकारी, ईट अधिनस्त गावातील शेतकरी व महिला यांच्यासाठी आयोजित शासन जोडणी कार्यशाळेत “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली
यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री निखिल रायकर यांनी पौष्टिक तृणधान्य ची ओळख,त्याचे आरोग्यासाठीचे महत्व व प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी असलेली संधी, PMFME योजना याबाबत माहिती दिली.तसेच पौष्टिक तृणधान्य आहारात सेवन करणे, जनजागृती करणे याबाबत “सामूहिक शपथ” घेण्यात आली. पौष्टिक तृणधान्य पदार्थांची पाककला स्पर्धा,पौष्टिक तृणधान्य थाळी इ संकल्पना समजावून त्याचे नियोजन करण्याबाबत वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट चे भूम येथील अधिकारी यांना आवाहन केले. याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात याचे नियोजन करता येईल असे सांगितले. यावेळी भूम पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक श्री मंगेश साळवे, ग्रामीण रुग्णालय भूम येथील समुपदेशक श्री तटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.ही कार्यशाळा गजानन महाराज मंदिर सभागृह,ता.भूम जि.उस्मानाबाद येथे पार पडली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →