आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने मकर मकर संक्रांत भोगीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय, झरि जामणी यांच्या वतीने आज शनिवार दिनांक 14 जानेवारी मौजे निंबादेवी तालुका, झरी येथील गंगाधर धुर्वे यांच्या शेतात तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी गावात पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी अमोल आमले यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्वारी, बाजरी, राजगिरा या पिकांचे मानवाच्या जीवनातील महत्व व त्यामध्ये असणारे पोषण मूल्याची माहिती सांगितली तसेच तालुक्यामध्ये ज्वारी,बाजरीचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यावरील प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घटकांची माहिती दिली.कृषी सहाय्यक पांडुरंग ताटे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व संबंधित योजनेचे अर्ज जागेवर भरून घेण्यात आले. प्रसंगी निंबा देवी टेंभी गावातील शेतकरी व बचत गटातील महिला, तालुका कृषी अधिकारी अमोल आमले,कृषी पर्यवेक्षक फुलझेले,कृषी सहाय्यक सुधीर मोघे, पांडुरंग ताटे, नरेंद्र कांबळे, मनोज कोरांगे उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना पौष्टिक जेवण बाजरीची भाकरी व झुणका-चटणी याची सोय करण्यात आली होती