आज दिनांक 17/01/23 रोजी मौजे मेढा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त श्रमिक महिला बचत गट सहकारी संस्था व मंडळ कृषि अधिकारी मेढा यांचे संयुक्त विद्यमाने महिला मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी माननीय तहसीलदार श्री पोळ साहेब, श्री.रमेश देशमुख साहेब तालुका कृषी अधिकारी, जावली (मेढा), श्रमिक जनता सहकारी संस्थेचे संस्थापक श्री आदिनाथ ओबळे, मंडळ कृषि अधिकारी श्री संजय घोरपडे उपस्थित होते. मा देशमुख साहेब यांनी पौष्टिक तृणधान्याचे आपल्या आहारातील महत्त्व व त्याचे आपल्या शरीरासाठी होणारे फायदे याविषयी महिलांशी संवाद साधला. तसेच महिला बचत गटामार्फत कोणकोणते उद्योग आपण करू शकतो व आपली आर्थिक उन्नती कशाप्रकारे साधू शकतो याविषयी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन कृषी सहाय्यक श्री अनिल चव्हाण , तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला बचत गटाच्या कुलकर्णी मॅडम व इतर महिलांनी परिश्रम घेतले. आभार सौ कुलकर्णी यांनी मानले