आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्व व जनजागृती कार्यक्रमाचे कणुर ता वाई येथे आयोजन

वाई दि.17 जानेवारी २०२3. कणुर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री. डी एम काळे , सेवानिवृत्त शास्त्रज्ञ बी ए आर सी. हे होते. माननीय श्री. संग्राम पाटील विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व समजावून सांगितले.

माननीय श्री. महेश बाबर विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांनी के व्ही के बोरगाव मार्फत राबविण्यात येत असलेल्या भुईमूग पिकाच्या फुले चैतन्य या पीक प्रात्यक्षिक बाबत मार्गदर्शन केले.माननीय श्री धनाजी फडतरे कृषी सहाय्यक सातारा यांनी भुईमूग पिकाच्या फुले चैतन्य या वाणाच्या लागवडीसाठी आवश्यक बीज प्रक्रिया, लागवड पद्धत, पाणी व खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन केले.अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा.श्री.डी एम काळे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ बी ए आर सी. यांनी शास्त्रोक्त पद्धतीने भुईमूग लागवड केल्यास उच्चांकी उत्पादन घेणे शक्य असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी भुईमूग पिकाबाबत सखोल मार्गदर्शन करून उत्पादन वाढीचा कानमंत्र दिला.

तालुका कृषी अधिकारी वाई मा. श्री. प्रशांत शेंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . सदर कार्यक्रमास मा.श्री निखिल राजपुरे सरपंच कणुर, मा. श्री. जगन्नाथ राजपुरे चेअरमन कृषी विकास सोसायटी कणुर, मा.श्री.मारुती राजपुरे व्हाईस चेअरमन कृषी विकास सोसायटी कणुर, श्री. तानाजी यमगर कृषी पर्यवेक्षक वाई, कृषी सहाय्यक सौ. ललिता बोडके, श्री निखिल मोरे, श्री विलास भुसारे,ए टी एम श्री योगेश जायकर, प्रगतशील शेतकरी श्री सुनील राजपुरे, संदीप राजपुरे, व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बी.टी.एम. आत्मा श्री प्रदीप देवरे यांनी केले मा.श्री. रविंद्र बेलदार मंडल कृषी अधिकारी वाई, यांनी आभार मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →