पौष्टिक तृणधान्य दिन कार्यक्रम

नागरिकांनी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य असलेल्या ज्वारी, बाजरी, नाचणी, वरळी, राळा व राजगिरा या धान्याचा समावेश करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून मकर संक्रांति भोगी या सणाचा दिवस जिल्ह्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला यानिमित्त आत्म्याच्या कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. धान्याचे आरोग्यातील महत्त्व यावर चर्चासत्र घेण्यात आले जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमणशेट्टे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, कापूस संशोधन केंद्राचे प्रा. अरविंद पांडागळे, आत्म्याच्या प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे, नांदेड तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →