. आंतररराष्ट्रीय पातळीवर सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणुन जाहिर केले आहे. पुर्ण वर्षभरात प्रत्येक महिना हा एका तृणधान्य पिकासाठी जाहिर केलेला आहे.दिवसेंदिवस पौष्टीक तृणधान्य पिकांचे सेवन आहारातून कमी होत आहे व गहु,मैदा यापासुन बनवलेल्या पदार्थांकडे लोकांचा कल वाढत चालला आहे ,परंतु उत्तम आरोग्यासाठी पौष्टीक तृणधान्यपिकांचे सेवन अतिशय महत्वाचे आहे.कृषी विभागामार्फत सर्वच पातळीवरती गावबैठका व इतर प्रसार माध्यमांच्या माध्यमातुन पौष्टीक तृणधान्य पिकांबाबत जनजागृती सुरु आहे . जानेवारी महिना हा बाजरी पिकासाठी समर्पित महिना म्हणुन जाहिर केला आहे. त्या निमित्त आज दिनांक 17/01/2023 रोजी मा.श्री. हरिराम नागरगोजे तालुका कृषि अधिकारी रेणापुर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिन व बाजरा पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी, लातुर मा.श्री. महेश क्षिरसागर साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणुन रेणापुर तालुक्याच्या तहसिलदार मा. श्रीमती.धम्मप्रिया गायकवाड मॅडम उपस्थित होत्या.
रोजच्या आहारामधे तृणधान्याचे सेवन किती महत्वाचे आहे व त्यामधील पोषण मुल्याविषयी तालुका कृषी अधिकारी मा.श्री.नागरगोजे सरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
बाजरीच्या पाककला स्पर्धेमध्ये १२ कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी स्पर्धक यांनी हिरहिरीने सहभाग घेतला सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्रीमती प्रमिला जंजीरे मंकृअ पानगाव व व्दितीय परितोषक श्रीमती महानंदा बगदुरे व श्रीमती हेमा भंडारे यांनी पटकावले व तिसरे पारितोषक श्रीमती मनकर्णा माळी व श्री. धिरेश आटुळे यांनी पटकावले. ताकृअ, रेणापूर.