आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 अंतर्गत मौजे – आलेवाडी कुडाळ मंडळ तालुका जावळी जिल्हा सातारा येथिल शेतकरी बचत गट, महिला बचत गटांचा कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 अंतर्गत मौजे – आलेवाडी कुडाळ मंडळ तालुका जावळी जिल्हा सातारा येथिल शेतकरी बचत गट, महिला बचत गटांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी गावचे दत्तकृपा शेतकरी बचत गट काळेश्वरी शेतकरी बचतगट ,पद्मावती ग्रामसंघ आलेवाडी गटातील महिला तसेच या महिला बचत गट सदस्या तसेच इतर महीला ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मंडल कृषी अधिकारी कुडाळ श्री ज्ञानदेव जाधव यांनी प्रस्तावना व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले *.श्री संग्राम पाटील सर शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांनी पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन केले.श्री टी डी ढगे तंत्र अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी यांनी उपस्थित शेतकरी महिलांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी आर.पी देशमुख यांनी यांनी तृणधान्य पिकातील न्यूट्रिशन व्हॅल्यू विशेषता बाजरी ज्वारी या पिकातील आहारातील महत्त्व सांगितले. महिला शेतकरी यांनी महिलांचा आत्मा अंतर्गत गट तयार करून गटामार्फत पौष्टिक तृणधान्यांचे प्रक्रिया करण्याकरिता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत लाभ घ्यावा. गटामार्फत उत्पादन व विक्री करणे सोयीचे व कमी खर्चिक होईल.यावेळी कृषी सहाय्यक श्री शांताराम इंगळे यांनी भाजीपाला मीनी किट व न्यूट्रिशन व्हॅल्यू माहिती पत्रक उपस्थित महिलांना वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक डी एम.डोबाळे बी.एम चोरगे पी.व्ही.खाडे डी.वाय.सापते गावचे पोलीस पाटील विठ्ठल पिसाळ बाबुराव पवार विष्णू पवार अक्षय पवार रामचंद्र दत्तात्रय बिरामणे नामदेव पवार सुधाकर भिलारे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री बाबुराव पवार दत्त कृपा शेतकरी बचत गट अध्यक्ष यांनी केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →