संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तलासरी तालुक्यात ठाकरपाडा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.पौष्टिक अन्न उत्तम आरोग्य, पौष्टिक अन्नाचे सेवन करा, पौष्टिक तृणधान्ये सर्वात भारी, नाही दवाखान्याच्या दारी. या घोषवाक्याची घोषणा करण्यात आली.

पौष्टिक तृणधान्ये पिकांच्या उत्पादन वाढीबरोबर आरोग्य विषयक फायद्याबाबत जनजागृती करून आहारात प्रमाण वाढवून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये साजरा करण्याचा प्रमुख उद्देश असून तृणधान्याच्या पीठापासून भाकरी, डोसा, पापड, खीर, खिचडी यासारखे पदार्थांचा आहारात समावेश करावा तसेच तृणधान्यांचा आहारात समावेश केल्याने पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती, ह्रदय रोग, वजन कमी करण्यास उपयुक्त असल्याचे काव्या किशोर पाटील कृषि सहाय्यक, तलासरी यांनी सांगितले.
कार्यक्रमात २८ महिला व पुरुष सहभागी झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन मालती अविनाश खुलात महिला प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

सदरचा कार्यक्रमाचे सुनिल बोरसे मंडळ कृषि अधिकारी, तलासरी यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले असल्याचे सांगून काव्या पाटील कृषि सहाय्यक यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *