कृषि विभागा मार्फत आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस व महिला मेळावा मकरंसंक्रात औचित्य साधून गाव सासकल ता फलटण जिल्हा सातारा येथे साजरा

कृषि विभागा मार्फत आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस व महिला मेळावा मकरंसंक्रात औचित्य साधून गाव सासकल ता फलटण जिल्हा सातारा येथे साजरा करण्यात आला .यावेळी आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 तृणधान्य वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे तृणधान्य आहारातील महत्व व तृणधान्य पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे व बाजरी , ज्वारी , नाचणी , वरई ,राळा इतर तृणधान्य रोजच्या आहारात वाढविण्यासाठी तसेच तृणधान्य चे आहारातील महत्व मानवी आरोग्यासाठी वरदान असल्याचे यावेळी कृषि पर्यवेक्षक योगेश भोंगळे यांनी सांगितले यावेळी प्रस्तावना मध्ये आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 मध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रम बाबत माहिती कृषि सहायक सचिन जाधव यांनी सांगितले यावेळी बाजरीपासून तयार करण्यात आलेल्या सांडगे, भाकरी, चकली,पापड,इतर पदार्थां यावेळी ठेवण्यात आले होते यावेळी सुवर्णा उधोग वर्धिनी उधोजिका फलटण सुवर्णा कचरे यांनी तृणधान्यापासून विविध पदार्थ घरच्या घरी बनवण्याच्या पद्धती बाबत सविस्तरपणे माहिती दिली यावेळी सरपंच उषाताई फुले , जेष्ठ शेतकरी पोपट घोरपडे यावेळी कृषि पर्यवेक्षक योगेश भोंगळे , कृषि सहाय्यक सासकल सचिन जाधव व पंचक्रोशीतील महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते

कृषि विभागा मार्फत आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस व महिला मेळावा मकरंसंक्रात औचित्य साधून गाव सासकल ता फलटण जिल्हा सातारा येथे साजरा करण्यात आला

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →