“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत संक्रांत भोगी सणानिमित्य ज्वारी व बाजरीचे विविध प्रकारचे पदार्थ तयार करणे या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा 17/01/2023 in Stories Tagged वर्धा - 0 Minutes कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत दिनांक 07/12/2022 रोजी मौजा दहेगाव मिस्कीन येथील ग्रामपंचायत सभागृह येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष सन 2022-23 जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण मधून ज्वारीचे विविध प्रकारचे पदार्थ तयार करणे या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये ज्वारीपासून ज्वारी स्टिक, मटरी हे पदार्थ कृती करून महिला शेतकऱ्यांना शिकविण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेचे सविस्तर मार्गदर्शन केले व ज्वारीपासून बनणाऱ्या पदार्थाची विक्री व्यवसाय या योजनेमार्फत सुरू करणेबाबत आव्हान करण्यात आले.या प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी जिल्ह्याच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, वर्धा डॉ. विद्या मानकर, कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील श्रीमती. धुमाळ मॅडम दहेगाव मिस्कीन गावच्या सरपंचा सौ. चंदाताई नगराळे उपसरपंचा सौ. वैशालीताई मिस्किन, जिअकृअ, वर्धा कार्यालयाचे श्री. संजय डोंगरे, कृषी सहाय्यक, प्रियंका ताकसांडे उपस्थित होते. शेअर करा...