आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मिलेट ऑफ द मंथ बाजरी कार्यक्रम साजरा.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023, मिलेट ऑफ द मंथ बाजरी कार्यक्रम वसगडे ता.- करवीर, जिल्हा- कोल्हापूर येथे बापूसाहेब पाटील महाविद्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. योगेश बन सर नाचणी पैदासकार, विभागीय कृषि संशोधन केंद्र , शेंडा पार्क , कोल्हापूर यांनी शाळेतील विद्यार्थी व शेतकरी बांधवाना तृणधान्याचे आहारातील महत्व या बाबत मार्गदर्शन केले. यावेळी वसगडे गावचे नूतन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आत्मा समितीचे अध्यक्ष व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. शाळेपासून ग्रामपंचायत पर्यंत शालेय विद्यार्थ्यांना घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →