मकर संक्राती निमित् राधानगरी तालुक्यात बाईक रॅलीचा शुभारंभ.

ता. राधानगरी – आज दि.- 14 जानेवारी 2023 रोजी पौष्टिक तृणधान्य  दिन / मकर संक्राती निमित् कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे व कागलचे उपविभागीय अधिकारी श्री. सुशांत बनसोडे यांच्या हस्ते राधानगरी तालुक्यात बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. सन 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. मकर संक्राती सणाचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी राधानगरी व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातून बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

प्रत्येक  कृषी सहाय्यक आपल्या गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्य आधारित चर्चासत्र तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या  जाती  नाचणी, बाजरी, ज्वारी, राळा, वरी या पिकांच्या लागवडी बाबत व पिकाचे महत्व याविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पौष्टिक तृणधान्य शेतकऱ्यांच्या यशोगाथा विविध पदार्थांची माहिती देण्यासाठी प्रगतशील शेतकरी, आहार तज्ञ, विद्यापीठ शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रम आयोजन करून तालुक्यामध्ये प्रचार प्रसिद्धी करणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी श्री. प्रशांत कासराळे यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी  मंडल कृषी अधिकारी श्री. ए. व्ही. सांगळे , श्रीमती श्रुतिका नलवडे , श्री. अमोल कांबळे व कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →