आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टीक तृणधान्य दिनाच्या अनुषंगाने जयसिंगपूर मंडळ कृषि अधिकारी कार्यक्षेत्रातील जैनापूर ग्रामपंचायत येथे महिला शेतकरी मेळावा घेण्यात आला. यामद्ये कृषि सहाय्यक श्रीमती सुजाता हजारे यांनी सर्वांचे स्वागत केले. कृषि पर्यवेक्षक श्री. संजय सुतार यांनी तृणधान्य याचे आहारातील महत्व विषद केले. तसेच मंडळ कृषि अधिकारी, जयसिंगपूर श्री. दत्तात्रय आवारे यांनी पौष्टीक तृणधान्य वर्ष साजरे करताना आपली शारीरिक अन्नघटकांची गरज व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये पौष्टीक तृणधान्याचा कसा समावेश होईल याची सविस्तर माहिती दिली. महिलांनी पौष्टिक तृणधान्यपासून पाककृती करून वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते व त्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या यात पहिले 5 नंबर काढून सदर पाककृती करणाऱ्या महिलांना बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.