कृषी विभाग व विवेकानंद संस्कार बहुउद्देशीय मंडळ संचलित विवेकानंद इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल शिरसोली येथे स्नेहसंमेलनात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त2023 तृणधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर , राजगिरा आदी पिकांची लागवड व दैनंदिन आहारात तृणधान्याचा जास्तीत जास्त समावेश करावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.याप्रसंगी जि प सदस्य श्री प्रताप पाटील,माजी पंचायत समिती सभापती श्री नंदलाल पाटील , शिरसोली प्र न सरपंच श्री हिलाल भिल, शिरसोली प्र बो सरपंच श्री प्रवीण बारी व व दोन्ही गावातील ग्रामपंचायत सदस्य, तसेच विवेकानंद पब्लिक स्कूलचे अध्यक्ष गोपाल काटोले सचिव किरण बारी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय वाणी तसेच तज्ञ संचालक मंडळ व कृषी सहाय्यक कमलेश पवार, भारत पाटील आदींची उपस्थिती होती.