ता. चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन

रविवार, दि.15/01/2023 मौजे अडरे ता. चिपळूण येथे मकरसंक्रांतच्या निमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषि अधिकारी चिपळूण श्री शाहु पवार यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित महिला व शेतकरी वर्ग यांना मंडळ कृषि अधिकारी श्री मनोज गांधी यांनी पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व तसेच कृषि विभागाच्या योजना या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ताकृअ श्री . शाहु पवार यांनी पौष्टिक अन्नधान्य पिका खालील क्षेत्र वाढविण्याचे आवाहन उपस्थिताना केले. कृषि पर्यवेक्षक श्री एस आर भोसले यांनी कार्यकमाचे प्रस्ताविक केले व कृ स श्रीम. कविता चव्हाण यांनी कार्यकमाचे संपूर्ण नियोजन केले. सदर कार्यक्रमास सरपंच सौ. सोनाली पिंपरे , ग्राप सदस्य सौ. दिक्षा कांबळी, श्री विनायक कांबळी, प्रगतशिल शेतकरी श्री . जिवाजी कांबळी तसेच महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →