आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष २०२३ निमित्त शहापूर येथे कार्यक्रम

आज दिनांक ३०/१२/२०२२ रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शहापूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष २०२३ कार्यक्रम विषयावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या शहापूर तालुक्यातील सर्व क्लस्टर मधील व्यवस्थापक, महिला गट सदस्य यांच्या साठी मा.श्री. दिपक कुटे साहेब. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमात सौ.अस्मिता मोहिते मॅडम मआविम प्रमुख ठाणे जिल्हा, श्री. हेमंत पाटील जिल्हा व्यवस्थापक, श्री. अमोल आगवान साहेब तालुका कृषी अधिकारी, शहापूर श्री. घुडे मंकृअ,खर्डी, श्री.गिरी कृषी अधिकारी, शहापूर श्री. खांडगे तातंव्य आत्मा, शहापूर व श्री. कदम. सतंव्य आत्मा, शहापूर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात मा.श्री. दिपक कुटे साहेब. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष २०२३ कार्यक्रमाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करताना तृणधान्ये मधील पंच सुत्री बाबतीत सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील मआविम च्या ३५ महिला शेतकर्यांनी सहभाग घेतला.

शेअर करा...