आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 अंतर्गत मौजे -हातगेघर तालुका जावळी जिल्हा सातारा येथे महिला बचत गटांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी गावचे सरपंच प्रमिलाताई गोळे,हरीओम,निरंतर तसेच यशोदा या महिला बचत गट सदस्या तसेच इतर महीला ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मंडल कृषी अधिकारी कुडाळ श्री ज्ञानदेव जाधव यांनी तृणधान्य पिकातील न्यूट्रिशन व्हॅल्यू विशेषता बाजरी ज्वारी या पिकातील आहारातील महत्त्व सांगितले. महिला शेतकरी यांनी महिलांचा आत्मा अंतर्गत गट तयार करून गटामार्फत पौष्टिक तृणधान्यांचे प्रक्रिया करण्याकरिता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत लाभ घ्यावा. गटामार्फत उत्पादन व विक्री करणे सोयीचे व कमी खर्चिक होईल. यावेळी कृषी सहाय्यक श्री दशरथ डोंबाळे यांनी भाजीपाला मीनी किट व न्यूट्रिशन व्हॅल्यू माहिती पत्रक उपस्थित महिलांना वाटप करण्यात आले.