आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे निमित्ताने आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे , विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय ठाणे, कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा, जिल्हा मृद चाचणी प्रयोगशाळा व महाबीज ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मा. अंकुश माने, विभागीय कृषी संचालक, ठाणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी या कार्यक्रमास सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित असून तृणधान्य पासून बनविनलेल्या पाककृती चे प्रदर्शन भरवण्यात आले होते. याप्रसंगी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व त्याचा वापर आहारात जास्तीत जास्त करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.