अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्या वतीने दिनांक 05.11.23 रोजी बी. रघुनाथ सभागृह येथे आयोजित आयुर्वेदिक व्यासपीठ महोत्सव कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पौष्टिक तृणधान्य व त्यापासून बनवलेले पदार्थ याचे स्टॉल उभारणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. प्रताप काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी श्री. रवी हरणे, तंत्र अधिकारी डॉ. संदीप जगताप तसेच परभणी तालुका कृषी अधिकारी परभणी श्री. नित्यानंद काळे व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकरी यांनी पौष्टिक तृणधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी, भागर, राळा,राजगिरा) पासून बनवलेले पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध होते.सदर कार्यक्रमासाठी पौष्टिक तृणधान्य म्हणजेच ज्वारी,बाजरी, नाचणी, राळा, राजगिरा यांपासून काढण्यात आलेली रांगोळी हे मुख्य आकर्षण ठरले.