जेम्स इंग्लिश मीडियम स्कूल हिरावाडी नाशिक येथे “मिलेट मास्टर शेफ” स्पर्धेचे आयोजन

16 सप्टेंबर 2023 रोजी जेम्स इंग्लिश मीडियम स्कूल हिरावाडी नाशिक येथे “मिलेट मास्टर शेफ” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पौष्टिक तृणधान्य पदार्थांचा समावेश आहे. यावेळी शशिकांत बोडके, शेतसरी FPO आणि कोमल न्यायाधीश म्हणून उपस्थित होतो. मुलांना बाजरीचे व तृणधाण्याचे पदार्थ आवडावेत आणि पालकांना तृणधान्यचे महत्त्व कळावे यासाठी हा कार्यक्रम खूप उपयुक्त ठरला. या शाळेत आम्ही यापूर्वी “मिलेट पे चर्चा” हा उपक्रम राबविला होता आणि त्यातून ही संकल्पना पुढे आली आणि स्पर्धा यशस्वी झाली. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना फॉर्मी फुड्स कडून भाकरवाडीला ज्वारी बाजरीचे बक्षीस देण्यात आले या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सुरेख आयोजन मुख्याध्यापकांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →