विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम

दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे “मिलेट पे चर्चा” या कार्यक्रमाचे नाशिकचे लाडके माननीय विभाग आयुक्त श्री राधाकृष्ण गमे सर यांच्या हस्ते झाले.पौष्टिक तृणधान्य म्हणजेच मिलेट्स याबद्दल विभागीय आयुक्त कार्यालयामधील सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी माननीय विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे साहेब तसेच सह आयुक्त श्री पाटील साहेब आणि कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.पौष्टिक तृणधान्य आपल्या आरोग्यास कसे चांगले आहेत, कोणते तृणधान्य खाल्ल्यास आपले कोणते आजार टळू शकतात याविषयी मी शशिकांत बोडके, शेतसरी फार्मर प्रोड्यूसर कंपनी सविस्तर माहिती दिली,त्याचबरोबर माननीय विभागीय आयुक्त श्री गमे साहेब यांनी पौष्टिक तृणधान्याचा वापर किती महत्त्वाचा आहे याबद्दल सर्वांना समजावून सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →