दि.१३/०९/२०२३ रोजी एरंडोल येथे तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

दि.१३/०९/२०२३ रोजी एरंडोल येथे तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा श्री जाधवर सर (उपविभागीय कृषि अधिकारी अमळनेर) व श्री किरण जाधव सर(शास्त्रज्ञ केवीके ममुराबाद) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री गंभीरे (तालुका कृषि अधिकारी एरंडोल) यांनी उपस्थितांना तृणधान्याचे आहारातील महत्व यावर मार्गदर्शन केले. एरंडोल तालुक्यातील महिलांनी विविध प्रकारच्या पौष्टिक तृणधान्यापासून बनवलेले पदार्थ या स्पर्धेकरीता आणले होते. स्पर्धेचे परिक्षण करणेकरीता प्रसिध्द शेफ सौ शैलाताई चौधरी या उपस्थित होत्या. सदर स्पर्धेमध्ये खालीलप्रमाणे महिला विजेत्या झाल्या: 🥇प्रथम क्रमांक:सौ कल्पना शामकांत पाटील 🥈द्वितीय क्रमांक:सौ मनिषा विजय कोळी। 🥉 तृतीय क्रमांक:सौ वर्षा संदीप बावीस्कर . विजेत्या महिलांना मिलेट मग व प्रमाणपत्र तसेच सहभागी महिलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता उमेद तालुका समन्वयक श्री गुलाब चव्हाण सर तसेच एरंडोल कृषि विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →