हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कृषि विभागाच्या विविध योजनाच्या जनजागृतीसाठी दि. १८ ते २४ ऑगस्ट २०२३ दरम्यान तालुका कृषि अधिकारी मोखाडा यांच्या माध्यमातून आज दि. 22/08/2023 रोजी मौजे..उधळे या मंडळ कृषी अधिकारी, खोडाळा कार्यक्षेत्रात उधळे या ठिकाणी “कृषि योजनांचा माहिती मेळावा” *आयोजित करण्यात आला होता.
*या कार्यक्रमात कृषि सहाय्यक श्री. मिटकरी यांनी सविस्तर पणे योजनांची माहिती दिली त्यात प्रामुख्याने खालील योजनांचा लाभ कसा घेता येईल व योजना राबवतांना शेतकऱ्यांकडून होणाऱ्या चुका त्या कशा सुधारता येतील याविषयी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची समर्पक उत्तर देऊन त्यांना मार्गदर्शन केले.
१. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड
२. स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
३. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFME)
४. महाडिबीटी अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजना
(उदा. ट्रॅक्टर, पावर टिलर, भात लावणे यंत्र व इतर सर्व शेती उपयोगी अवजारे)
५. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत शेत तळे (CMKSY)
६. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
७. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत विविध योजना (MIDH)
८. प्रधानमंन्त्री कृषि सिंचन योजना (PMKSY) उदा. ठिबक व तुषार सिंचन पद्धत
९. हवामान आधारित फळपिक विमा योजना
१०. प्रधानमंन्त्री पिक विमा योजना (PMFBY)
११. आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृण धान्य वर्षा निमित्त शेत तिथे पौष्टिक तृण धान्य
१२. आत्मा योजने अंतर्गत परसबागेत भाजीपाला मीनीकिट वाटप
13.. PM Kisan बाबत माहिती देण्यात आली
कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन कृषि सहाय्यक,करोल श्री..शिंदे यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी सोळुंके साहेब, उपस्थित राहून मर्गदर्शन केले. वरील प्रमाणे योजनांची माहिति मिळाल्यामुळे पंचक्रोशीतील उपस्थित शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले…तसेच PM kisan योजनेत समाविष्ट असणाऱ्या पात्र, अपात्र लाभार्थी, मयत लाभार्थी यांची यादी वाचून सामाजिक अंकेशन करण्यात आले..