वाडा तालुक्यात कृषि विभागाच्या योजनांचा मेळवा मधे पौष्टिक तृणधान्य महत्व बाबत

मौजे केळठण येथे आज दिनांक 25/08/2023 रोजी कृषी विभागाच्या योजनांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता.त्या मेळाव्याला उपस्थित यांना मार्गदर्शन करताना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2023 – 24 करिता आंबा, काजू कमी खर्चात,कमी पाण्यात अल्पश्रमात येणारी पिके काजू,सीताफळ लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ,मागेल त्याला शेततळे, तलावातील मत्स्य शेती, भात मजगी, MAHADBT, MIDH व इतर योजनांची योजनांची माहिती देण्यात आली.तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे महत्त्व सांगून तृणधान्य चे आहारातील महत्त्व याबाबत सर्वांना मार्गदर्शन करताना कृषी पर्यवेक्षक श्री.घरत साहेब, कार्यक्रमाला माननीय सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक, कृषी सहाय्यक श्री आर. ए. चव्हाण व शेतकरी उपस्थित होते सर्व उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →