गुणवरे ता.फलटण जि. सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने विध्यार्थी पोषण जनजागृती मोहीम तसेच मिलेट ऑफ द मंथ राजगिरा च्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना पौष्टिक तृनधान्य बाबत आहारातील महत्व याबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित कृषी सहाय्यक, शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद ,सरपंच अधिका उत्तमराव गावडे

पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर करणे काळाची गरज.. सरपंच अधिका उत्तमराव गावडे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मौजे गुणवरे येथील प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्यचाआहारात वापर व महत्व याबाबत जागरूकता व दैनंदिन आहारात समावेश व्हावा,वापरामुळे होणारे फायदे याविषयी माहिती व्हावी यासाठी मा.उपविभागीय कृषी अधिकारी फलटण,मा.तालुका कृषी अधिकारी फलटण,मा.मंडळ कृषी अधिकारी बरड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात सरपंच यांनी पौष्टिक तृणधान्य आहारात वापर करणे काळाची गरज आहे.त्यामुळे आपणास शुगर, बीपी इत्यादी आजारांवर मात करता येईल तसेच आरोग्य उत्तम राहील असे सांगितले. कृषी विभागाने आयोजित केलेला कार्यक्रम चांगल्या प्रकारे आहे. आशा कार्यक्रमाची आज गरज असून प्रत्येक मनुष्य व बालक सुदृढ व निरोगी होण्यास या कार्यक्रमामुळे मदत होईल. अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक ग्रामपंचायती च्या वतीने आयोजित करून लोकजागृती चळवळ स्वरूपात करावी. आम्ही आमच्या ग्रामपंचायत वतीने कार्यक्रम आयोजित करून कृषी विभागाला सहकार्य करू. पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर सर्वांनी करावा असे आव्हान केले. कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय एकळ यांनी विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य ओळख व आहारातील महत्व बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थी व मान्यवर, शिक्षक, कृषी महाविद्यालय विद्यार्थिनी यांच्या समवेत पौष्टिक तृणधान्य विषयी माहिती म्हणी व फायदे याविषयीचे जन जागृती होण्यासाठी फलक घेऊन गावात प्रभात फेरी काढण्यात आली.जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना व उपस्थितांना दृकश्राव्य साधनाद्वारे पौष्टिक तृणधान्य ओळख व आहारातील वापर यामुळे होणारे फायदे याविषयी चित्रफित दाखवण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना व उपस्थितांना राजगिरा या तृणधान्यापासून बनवलेली चिक्की वाटप करण्यात आली.
सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सौ. सविता भारत आढाव, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव लंगुटे , ग्रामविकास अधिकारी विलास दंगाने,महादेव आनंदराव गावडे, मधुकर गावडे, राजू गावडे, सतीश गौंड, बापूराव गौंड.जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अर्जुन राऊत, काकडे सर , धुमाळ मॅडम व कृषी महाविद्यालय फलटण येथील विद्यार्थिनी स्वप्नाली खरात, साक्षी दबडे, साक्षी इंगुळकर, प्रतीक्षा जमदाडे, ऐश्वर्या गायकवाड, स्नेहल शेंडे, शितल तांबे व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी,मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र गायकवाड कृषी सहाय्यक गुणवरे यांनी केले…

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →