सरलादेवी यशवंतराव माने हायस्कूल कागल, जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट जागरूकता कार्यक्रम संपन्न.

दिनांक- ९.८.२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम-कार्यक्रम सरलादेवी यशवंतराव माने हायस्कूल कागल, ता. कागल जिल्हा- कोल्हापूर येथे झाला. सदर कार्यक्रमामध्ये ३०० विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य राजगिरा तसेच ज्वारी, बाजरी, राळा, वरी इत्यादी विषयक माहिती देण्यात आली. व सदर तृणधान्य आहारात वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिक्षक वृंद, कृषि पर्यवेक्षक प्रतिभा देसाई व कृषि सहाय्यक श्री.बी. बी किनेकर.उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →