बीड जिल्ह्यात “पौष्टिक तृणधान्य दिन” उत्साहात साजरा….

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष-2023 निमित्त “पौष्टीक तृणधान्य दिन” साजरा करण्यात आला याप्रसंगी “पौष्टीक तृणधान्य आरोग्याची शिदोरी” याबाबत मा.श्रीमती दिप्ती पाटेगावकर, कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र खामगाव, ता. गेवराई यांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले, तसेच पौष्टीक तृणधान्याच्या आहारातील महत्वाबाबत प्रदर्शनी, बाजरी पिकाचे आहारातील महत्वा बाबत घडीपत्रिकाचे विमोचन, पाककृतीसह पौष्टिक तृणधान्यपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले, यावेळी मा. जिल्हाधिकारी, श्री राधा बिनोद शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी मा.श्री. आदित्य जिवने, मा.श्री. शिवप्रसाद जटाळे, लेखा व वित्त अधिकारी, जि.प.बीड. मा.डॉ.श्रीविजय कुमार देशमुख, पशुसंवर्धन अधिकारी, बीड, श्रीमती त्रिवेणी बोंडे जिल्हा व्यवस्थापक उमेद बीड. तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड. तथा प्रकल्प संचालक आत्मा,श्री.एस.एम.साळवे, कृषि उपसंचालक श्री ए.एच बनकर, तंत्र अधिकारी श्री बी.आर. गंडे , उपिभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच कृषी विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी व शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी गट, महिला बचत गट व शहरातील नागरिकासह बीड जिल्ह्यातील २५० ते ३०० शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते…..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड

Learn More →