दि 15/01/2023 रोजी आरे बुद्रुक, रोहा येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत मकर संक्रांत सण साजरा करून त्यात पौष्टीक तृणधान्य बाबत चे महत्व सांगण्यात आले. तालुका कृषी अधिकारी करे साहेब यांनी नाचणी, ज्वारी, बाजरी, राजगिरा यापासून प्रक्रिया करून बनवण्यात येणारे पदार्थ व ईतर योजनांची माहिती सांगितली. महिलांना आठवड्यात किमान एक दिवस तरी पौष्टीक तृणधान्य चा आहारात समावेश करावा असे सांगितले.कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी सुतार साहेब, कृषी सहायक श्रीमती रासकर मॅडम, कृषी सहायक शिंदे मॅडम, महिला, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी उपस्थित होते.