मौजे वेशवी, ता. उरण, जि. रायगड येथे मकरसंक्रात या सणाचे औचित्य साधून पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा.

तालुका कृषी अधिकारी उरण रायगड यांच्या मार्फत आज दिनांक 14/01/2023 रोजी मौजे वेशवी ता उरण जिल्हा रायगड येथे मकरसंक्रात या सणाचे औचित्य साधून, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा. या वेळी महिलांना तृणधान्यापासून विविध पदार्थ बनवणे याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. पनवेल मधील स्नेहा देवधर यांनी महिलांना पाककला प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच डॉ. नीलिमा येवले (एम. डी. आयुर्वेदिक) यांनी महिलांना तृणधान्य मधील विविध घटक व त्यांचा आरोग्याला होणारा फायदा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी शिगवण साहेब यांनी सर्व योजनांची माहिती तसेच तृणधान्याचे प्रकार व त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्र. कृषी पर्यवेक्षक आर.पी भजनावळे कृषी सहाय्यक डी. टी. केणी, वेश्र्वी कृषी सहाय्यक विभावरी चव्हाण यांनीही महिलांना तृणधान्या चे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता सर्व महिलानीं आठवड्यातून एकदा आहारामध्ये तृणधान्याचा नक्की वापर करू अशी शपथ घेऊन केली. कार्यक्रमाला सर्व महिला बचत गट तसेच ग्रामपंचायत सदस्य सोनाली पाटील उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →