मौजा येन्सा ता. वरोरा येथे प्रांगणात प्रधानमंत्री पोषण शक्ती जनजागृती कार्यक्रम

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यामध्ये तृणधान्य (मिलेट) जागरूकता निर्माण करण्यासाठी मौजा येन्सा येथील शाळे मध्ये  मोहीम कार्यक्रम आयोजित करून सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यानी तृणधान्य पिकाची लागवड करून सध्याच्या जीवनशैलीत विद्यार्थांच्या आहारातील पोष्टीक पदार्थाचा आहार वाढविणे आहे.तृणधान्य पदार्थांचा वापर कमी होत असल्याने परिणामी आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे.उत्पन्नात वाढ करणे व लोकांमध्ये पोष्टीक गुणधर्माची जागरूकता निर्माण करून दैनंदिन आहारात त्याचा समावेश करण्याचे दृष्टीने कृषि विभागाचे माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुक्यात 1आगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत  सर्व शाळांतील मुलांमध्ये तृणधान्याचे महत्व पटवून देण्यात आले विद्यार्थ्यांना पोषण जागरूकता मोहीम बाबत  कु पि .बी .चव्हाण  मंडळ कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन  केले .कार्यक्रम प्रसंगी श्री लोखंडे सर कृषी पर्यवेक्षक टेंभुर्डा व श्री देशमुख कृषी सहाय्यक व तेथील शिक्षक वृद्ध उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →