मोखाडा तालुक्यातील दांडवल गावात विद्यार्थाना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने मौजे दांडवळ तालुका मोखाडा येथे जिल्हा परिषद शाळा, दांडवळ येथे कार्यक्रम घेण्यात आले, त्याचबरोबर शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनीना आंतरराष्ट्रीय मिलेट मिशन वर्ष 2023 ची माहीती देऊन  तृणधान्याचे आहारातील महत्व व गुणधर्म, तृणधान्य सेवन करणे ही काळाची गरज व इतर तृणधान्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मिलेट ऑफ मंथ राजगिरा लाडुचे विद्यार्थ्याना वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन  कृषि सहाय्यक दांडवळ श्री.तुषार देसले यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री.बी.पी पवार कृषि पर्यवेक्षक, मोखाडा उपस्थित राहुन मार्गदर्शन केले उपसरपंच लक्ष्मी झिंजुर्डे, ग्रामपंचायत सदस्य जगदीश झिंजुर्डे, प्रगतशील शेतकरी चंदर येले  सोबत गायकवाड सर यांचे अनमोल सहकार्य मिळाले…

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →