आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमीत्त मकरसंक्रांती – भोगी हा सण पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर येथे साजरा

दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंडपिपरी मार्फत तालुका बीज गुणन केंद्र, विठ्ठलवाडा तालुका गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमीत्त मकरसंक्रांती-भोगी हा सण पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्त तालुका शेतकरी सल्लागार समिती चे अध्यक्ष श्री नामदेवजी सांगडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉ. नितेश पावडे यांनी आहारातील तृणधान्य चे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्री मंगेश पवार यांनी उन्हाळी बाजरी पीक लागवड तंत्रज्ञान आणि कृषी अधिकारी श्री प्रफुल अडकिने यांनी ज्वारी पीक लागवड तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. Millets of Month – बाजरी म्हणून 25 शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते बाजरी बियाणे किट आणि जिवाणू संघ वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांना जेवणात ज्वारी व बाजरी च्या भाकरी देण्यात आल्यात. कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा ह्याची धान्य नमुना म्हणून ठेवण्यात आले. सदर कार्यशाळेची प्रस्तावना मंडळ कृषी अधिकारी, गोंडपिपरी श्री सचिन पानसरे यांनी केली, कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषी पर्यवेक्षक धाबा श्री गोकुळ पाटील यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी, धाबा श्री विलास गलांडे यांनी केले. सदर कार्यशाळेला शेतकरी वर्ग, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →