मिलेट ऑफ मंथ राजगिरा कांचनपूर ता. मिरज जि.सांगली

आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा कांचनपुर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत विद्यार्थी पोषण जागृती मोहीम कार्यक्रम घेण्यात आला यावेळी माननीय सागर कांबळे मंडळ कृषी अधिकारी कुपवाड यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले तसेच श्री कुलकर्णी कृषी पर्यवेक्षक कुपवाड दोन यांनी पौष्टिक तृणधान्यापासून तयार होणाऱ्या प्रक्रिया पदार्थाबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सर्व नियोजन श्री ननवरे कृषी सहाय्यक कांचनपूर यांनी केले सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमात मिलेट ऑफ द मंथ राजगिरा पासून तयार केलेले लाडू विद्यार्थ्यांना वाटण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →