तलासरी तालुक्यातील महसूल सप्ताह निमित्त पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

तलासरी
दि. ७ ऑगस्ट, २०२३
महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ मा. तहसीलदार, तलासरी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश भोये नगराध्यक्ष, तलासरी हे होते.

सप्ताहात घेतलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार यांनी केले.
प्रास्ताविकात कृषि विभागाने महसूल सप्ताहामध्ये सहभाग घेऊन पीक विमा योजना, शेतकरी अपघात विमा, आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्ष व आहारात तृणधान्ये महत्व याबाबत माहिती कृषि अधिकारी यांनी दिल्याचे सांगितले.

महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास उप सभापती, पंचायत समिती तलासरी, पंचायत समिती सदस्य, सरपंच, पोलिस निरीक्षक, तलासरी, पत्रकार उपस्थित होते.
-सुनिल बोरसे
मंडळ कृषि अधिकारी तलासरी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →