तालुका कृषी अधिकारी देवरी यांच्या वतीने ग्रामीण भागात पौष्टिक तृणधान्य दिवस कार्यक्रमांचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आठवडी बाजारचे औचित्य साधून दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी मौजा चीचगड ता. देवरी. येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तृणधान्याचे पोषण मूल्य व आहारातील महत्त्व या विषयी मार्गदर्शन एस.के.धांडे कृषी अधिकारी, देवरी यांनी केले तसेच पौष्टिक तृणधान्य कोदो, कुटकि,नाचणी चे क्षेत्र वाढवणे विषयी शेतकऱ्याची सविस्तर चर्चा केली व समस्या समजून घेतल्या.
यावेळी गावचे ग्रामपंचायत सदस्य, मौजा चीचगड, पिपरखरी,सुंदरी,मोहांडी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाला कृषी सहाय्यक सुरेंद्र हूळे चीचगड, सचिन गावळ उचेपुर. बलकदास जांभूळकर,यांनी विभागाच्या विविध योजने विषयी माहिती दिली. व माहिती पत्रके वाटण्यात आले.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →